गदर २ ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

21 Sep 2023 16:01:46
 
gadar 2
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खरचं फार खास गेलं. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे अनेक चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले. त्यात सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ या चित्रपटाने तर इतिहास रचला. चित्रपटगृहांत दमदार कमाई करणारा हा चित्रपट आता ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पुढील महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी झी५ आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी करार केला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाचे हक्क झी५ ला विकले आहेत. दरम्यान, त्या चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासोबत उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा असे अनेक उत्तम कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Powered By Sangraha 9.0