महिलांचा आदर करणे हीच आपली संस्कृती - जेपी नड्डांनी विरोधकांना सुनावलं

21 Sep 2023 12:19:26
 jp nadda
 
नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक काल लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात आले आहे. आज राज्यसभेत पास झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्यसभेतील चर्चेदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महिलांचा आदर करणे हीच आपली संस्कृती असल्याचे विधान केले.
 
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, "महिलांसाठी आरक्षण विधेयक आणणे हा त्यांच्यावर उपकार नाही, कारण महिलांचा आदर करणे हीच आपली संस्कृती आहे." पुढे बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, "देशातील महिला कधीही कमकुवत आणि गरीब राहिल्या नाहीत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे असून अनेक गोष्टींमध्ये पुरुषांना मागे टाकले आहे."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनात पहिल्याच दिवशी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत सादर केले. या विधेयकाला एआयएमआयएमच्या २ खासदारांनी सोडून सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला.
 
 
Powered By Sangraha 9.0