कॅनडामध्ये आणखी एका खलिस्तानी आतंकवाद्याचा खात्मा; १५ गोळ्या झाडून केली हत्या

21 Sep 2023 11:40:26
Sukha Duneke 
 
मुंबई : कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनीके याची हत्या करण्यात आली. ​​सुखा दुनीके हा मोगा जिल्ह्यातील दविंदर बंबीहा टोळीतील एक खलिस्तानी समर्थक गुन्हेगार होता. सुखावर सुमारे १५ गोळ्या झाडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुखा २०१७ मध्ये बनावट कागदपत्रे बनवून भारतातून कॅनडाला पळून गेला होता.
 
भारतात सुखावर ७ गुन्हे दाखल आहेत. पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी सुखा बनावट कागदपत्रांद्वारे भारतातून पळून गेला होता. दोन दिवसांपूर्वीच कॅनडाच्या पंतप्रधानांनी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) च्या हरदीप सिंह निज्जरच्या राजकीय हत्येचा आरोप भारतावर केला होता.
 
त्यामुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता आणखी एका खलिस्तानी समर्थक गुन्हेगाराच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी समर्थक आतंकवाद्यांनी आश्रय घेतलेला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0