काँग्रेस पक्ष हा ओबीसी आरक्षणविरोधी : खा. सुशीलकुमार मोदी

21 Sep 2023 16:35:28
BJP MP Sushil Kumar Modi On Women's Reservation Bill

नवी दिल्ली :
महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात येत असून खा. सुशीलकुमार मोदींनी महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. खा. मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाने नेहमीच ओबीसींना विरोध केला असून काँग्रेसच्या काळात काका कालेलकर यांच्या समितीने दिले अहवाल का मान्य केला नाही. काँग्रेसने ६० वर्षांत महिलांना आरक्षण का दिले नाही असा सवालही सुशीलकुमार मोदींनी केला आहे.

दरम्यान, केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार असून पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे काँग्रेसच्या काळात देशातील महिलांना न्याय मिळाला नसून मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्न केले आहेत. तसेच, काँग्रेस ही नेहमीच ओबीसी आरक्षणासाठी विरोधक राहिली असल्याचा घणाघात खा. मोदींनी यावेळी केला. तसेच, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मंडल आयोगाचा विरोध केल्याचे खा. सुशीलकुमार मोदी म्हणाले.

 
Powered By Sangraha 9.0