‘थ्री इडियट्स’ फेम अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन

21 Sep 2023 17:23:51
 
akhil mishra
 
 
मुंबई : 'थ्री इडियट्स' या चित्रपटात छोटेखानी परंतु महत्वपूर्ण भूमिका केलेले लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटात त्यांनी लायब्रेरियन दुबे ही भूमिका साकारली होती. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अखिल स्वयंपाक घरात काम करत असताना घसरले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे ठोस कारण अद्याप समजले नाही.
 
अखिल यांनी 'डॉन', 'वेल डन अब्बा', 'हजारों ख्वाहिशे ऐंसी' या चित्रपटांत काम केले होते. या व्यतिरिक्त त्यांनी 'भंवर', 'उतरन' (उमेद सिंग बुंदेला), 'उडान', 'सीआयडी', 'श्रीमान श्रीमती', 'भारत एक खोज', 'रजनी' आणि इतर अनेक मालिकांमध्येही काम केले होते.
Powered By Sangraha 9.0