मुंबई : पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे मयुरेश्वराचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये मोरगाव स्थित आहे. मोरगावातील कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
बाप्पाच्या या आकर्षक मुर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहेत. तसेच मूर्तीवर नागाच्या फण्याचे सुंदर छत्र आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहेत. गणपती समोर नंदी असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे.
गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमरत्वाचे वरदान दिले होते. त्याने अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करवून आणले. त्यामुळे सिंधूसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्त्या गणपती कडे प्रार्थना दिली तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधूसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले. अशी या गणपतीची आख्यायिका सांगितली जाते.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq