महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना ओवैसींनी ओकली गरळ; म्हणाले....

20 Sep 2023 16:45:27
Parliament Discussion On Women's Reservation Bill

मुंबई :
केंद्र सरकारकडून विशेष संसद अधिवेशन घेण्यात आले असून अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभेत या चर्चेवर चर्चा करताना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून सहभाग घेण्यात आला आहे.

दरम्यान, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना पुन्हा एकदा गरळ ओकली. ते म्हणाले, मोदी सरकारला मुस्लिम किंवा ओबीसी महिलांचे नव्हे तर सवर्ण महिलांचे संसदेत प्रतिनिधित्व वाढवायचे आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, तुम्ही मुस्लिम महिलांना आरक्षणात कोटा न देऊन त्यांचा विश्वासघात करत आहात. त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने या विधेयकाला विरोध करत पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. 


Powered By Sangraha 9.0