मुंबई : तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बाल कलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर देखील प्रसिध्द आहे. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत तिची परीची भूमिका लोकप्रिय झाली. मायरा अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अॅक्टिव्ह आहे. टिकटॉकमुळे अनेकांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. टिकटॉक या अॅपवर मायराचे खूप फॉलोअर्स होते. मायराचे मायरास् कॉर्नर हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.इंस्टाग्रावर तिच्या रिल्सला चाहत्यांची पसंती मिळते. अवघ्या सहा वर्षाच्या मायराला लोकमत डिजीटल इनफ्लूरन्सर अवॉर्डही मिळाला आहे.
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर मायरा वैकुळने देखील या गाण्याच्या गजरात तिच्या घरी बाप्पा आणला आहे. तिने maha mtb कडून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती eco-friendly' गणेशा स्पर्धेसाठी आवाहन केले आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रोख, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रोख, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सरळ आणि सोप्पी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3RpZbSq या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी २८ सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल.
स्पर्धेची नियम व अटी :
१) उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी
२) श्रींच्या मूर्तीवरील रंग नैसर्गिक असावेत.
३) उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी
४)उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.
५) उत्सवात विजेचा अतिरेकी वापर न करता विजेची बचत करावी.
६) सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य
७) संपूर्ण उत्सवात सभोवतालच्या पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
८) पर्यावरणाचे रक्षण करत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे ५ फोटो आणि आपण केलेली सजावट पर्यावरणपूरक कशी आहे, याबद्दलचे तपशील दिलेल्या लिंक वर आम्हाला पाठवा.