लाडक्या बाप्पाची किती नावे माहित आहेत?

    20-Sep-2023
Total Views |

ganpati


मुंबई :
देवांमध्ये सर्वात लाडका देव म्हणून श्री गणेशाला ओळखले जाते. श्रीगणेशाची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जगभर प्रसिद्ध आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गणपती बाप्पाची अनेक नवसाची देवस्थळे आहेत. श्री गणेशाची जशी अनेक रूपे आहेत तशी त्याची अनेक नावेही आहेत. श्रीगणेशाची तब्बल १०८ नावे आहेत. या नावाचे अर्थही जाणुन घेऊया

गणपतीची १०८ नावे व अर्थ मराठी मध्ये पुढील प्रमाणे आहेत

१) अखूरथ - ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
२) अनंतचिदरुपम - अनंत व्यक्ती चेतना असणारे 
३) अमित - अतुलनीय देवता
४) अलंपत - अनंतापर्यंत असणारे देव
५) अवनीश - संपूर्ण विश्वाचे स्वामी
६) अविघ्न - संकटांना दूर करणारे
७) ईशानपुत्र - शंकराचे पुत्र
८) उद्दण्ड - नटखट असणारे
९) उमापुत्र - पार्वतीचा मुलगा
१०) एकदंत - एकच दात असणारे
११) एकदंष्ट्र - एकच दात असणारे
१२) एकाक्षर - एकच अक्षर
१३) कपिल - पिवळा रंग असणारे
१४) कवीश - सर्व कवींची देवता
१५) कीर्ति - यशाचे स्वामी
१६) कृपाकर - सर्वांवर कृपा ठेवणारे
१७) कृष्णपिंगाक्ष - कृष्णासमान डोळे असणारे
१८) क्षिप्रा - आराधना करण्यासारखे
१९) क्षेमंकरी - क्षमा करणारे
२०) गजकर्ण - हत्ती समान कान असणारे
२१) गजनान - हत्ती समान मुख असणारे
२२) गजवक्त्र - हत्ती समान मुख असणारे
२३) गजवक्र - हत्ती समान वक्राकार सोंड असणारे
२४) गजानन - हत्ती समान मुख असणारे
२५) गणपति - सर्व गणांचे स्वामी
२६) गणाध्यक्ष - सर्व गणांचे स्वामी
२७) गणाध्यक्षिण - सर्वांचे देवता
२८) गदाधर - ज्यांचे गदा हे शस्र आहे
२९) गुणिन - सर्व गुणांचे स्वामी
३०) गौरीसुत - आई गौरीचे पुत्र
३१) चतुर्भुज - चार हात असणारे
३२) तरुण - ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही, अमर
३३) दूर्जा - कधी न पराजित झालेले देव
३४) देवव्रत - सर्वांची तपस्या स्वीकारणारे
३५) देवांतकनाशकारी - वाईट राक्षसांचे विनाशक
३६) देवादेव - सर्व देवाचे देव असणारे
३७) देवेन्द्राशिक - सर्व देवांचे रक्षण करणारे
३८) द्वैमातुर - दोन आई असणारे
३९) धार्मिक - दान करणारे
४०) धूम्रवर्ण - ज्यांचा वर्ण धूम्र आहे
४१) नंदन - शंकराचे पुत्र
४२) नमस्तेतु - वाइटांवर विजय मिळवणारे
४३) नादप्रतिष्ठित - ज्यांना संगीत प्रिय आहे
४४) निदीश्वरम - धन संपत्ती देणारे
४५) पाषिण - दगडा सारखे मजबूत असणारे
४६) पीतांबर - पिवळे वस्त्र धारण करणारे
४७) पुरुष - अद्भुत व्यक्ती
४८) प्रथमेश्वर - सर्वात प्रथम येणारे देव
४९) प्रमोद - आनंद
५०) बालगणपति - सगळ्यात प्रिय बाळ
५१) बुद्धिनाथ - बुद्धी ची देवता
५२) बुद्धिप्रिय - ज्ञानाची देवता
५३) बुद्धिविधाता - बुद्धीचे स्वामी
५४) भालचन्द्र - ज्याच्या कपाळावर चंद्र आहे
५५) भीम - भव्य
५६) भुवनपति - देवांचे देव
५७) भूपति - धरतीचे स्वामी
५८) मंगलमूर्ति - सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
५९) मनोमय - मन जिंकणारे
६०) महागणपति - देवाधिदेव
६१) महाबल - अत्यंत बलशाली
६२) महेश्वर - संपूर्ण ब्रह्मांडाचे देव
६३) मुक्तिदायी - शाश्वत आनंद देणारे
६४) मूढ़ाकरम - आनंदात असणारे
६५) मूषकवाहन - ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
६६) मृत्युंजय - मृत्यूला हरवणारे
६७) यज्ञकाय - सर्व यज्ञा स्वीकार करणारे
६८) यशस्कर - यशाचे स्वामी
६९) यशस्विन - सर्वात लोकप्रिय देवता
७०) योगाधिप - ध्यानाची देवता
७१) रक्त - लाल रंगाच्या शरीराचे
७२) रुद्रप्रिय - शंकरांना प्रिय असणारे
७३) लंबकर्ण - ज्याचे कान लांब आहेत
७४) लंबोदर - ज्याचे पोट मोठे आहे
७५) वक्रतुंड - वक्राकार तोंड असणारे
७६) वरगणपति - वर देणारे देव
७७) वरदविनायक - यशाचे स्वामी
७८) वरप्रद - वर पूर्ण करणारे
७९) विकट - भव्य
८०) विघ्नराज - सर्व संकटांचे स्वामी
८१) विघ्नराजेन्द्र - सर्व संकटांचे स्वामी
८२) विघ्नविनाशन - संकटांचा अंत करणारे
८३) विघ्नविनाशाय - संकटांचा नाश करणारे
८४) विघ्नहर - संकट दूर करणारे
८५) विघ्नहर्ता - संकट दूर करणारे
८६) विघ्नेश्वर - संकट दूर करणारे
८७) विद्यावारिधि - विद्या देणारी देवता
८८) विनायक - सर्वांचे देवता
८९) विश्वमुख - संपूर्ण विश्वाचे देवता
९०) वीरगणपति- वीर देवता
९१) शशिवर्णम - चंद्रासमान वर्ण असणारे
९२) शांभवी -देवी पार्वती
९३) शुभगुणकानन - सर्व गुणांची देवता
९४) शुभम - सर्व शुभ कार्यांचे देवता
९५) शूपकर्ण -सुपाएवढे कान असणारे
९६) श्वेता - पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
९७) सर्वदेवात्मन - प्रसादाचा स्वीकार करणारे
९८) सर्वसिद्धांत - सफलतेची देवता
९९) सर्वात्मन - बह्मांडाची रक्षा करणारे
१००) सिद्धिदाता - इच्छा पूर्ण करणारे देवता
१०१) सिद्धिप्रिय - इच्छापूर्ती करणारे
१०२) सिद्धिविनायक - सफलता चे देवता
१०३) सुमुख - शुभ मुख असणारे
१०४) सुरेश्वरम - देवांचे देव
१०५) स्कंदपूर्वज -कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
१०६) स्वरुप - सौंदर्याची देवता
१०७) हरिद्र - स्वर्ण रंग असणारे
१०८) हेरंब - आईचा प्रिय पुत्र

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq