प्राप्तिकर विभागाने आयटीआर फायलिंगची धर्मादाय संस्थांसाठी अंतिम मुदत वाढवली

20 Sep 2023 12:33:11

Income Tax
 
 
प्राप्तिकर विभागाने आयटीआर फायलिंगची धर्मादाय संस्थांसाठी अंतिम मुदत वाढवली

नवी दिल्ली:प्राप्तिकर विभागाने धर्मादाय ट्रस्ट, धार्मिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवून ३० नोव्हेंबर पर्यंत केली आहे.तसेच निधी, ट्रस्ट, संस्था किंवा कोणत्याही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय संस्थेने फॉर्म 10 बी/10बीबी मध्ये आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत एक महिन्याने वाढविण्यात आली आहे.
 
कर फाईलिंग साठी आर्थिक वर्ष २३-२४ साठी फॉर्म आयटीआर-7 मध्ये उत्पन्न विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे असे कर विभागाने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
 
आयटीआर-७ धर्मादाय आणि धार्मिक कार्यात गुंतलेल्या संस्थांकडून दाखल केला जातो.याशिवाय राजकीय पक्ष, ट्रस्ट, संशोधन मंडळ, संस्था यांच्याकडूनही आयटीआर भरला जातो.
 
Powered By Sangraha 9.0