पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते? 'का' त्यांना मानाचं स्थान!

    19-Sep-2023
Total Views |
pune ganpati news

पुणे : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरु झाला असून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झाला आहे. गणेशचतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान पुणे आणि गणपती यांचे विशेष नाते आहे. पुण्यातील गणपतीचे आकर्षण केवळ राज्य किंवा देशातीलच नव्हे तर विदेशातील भक्तांना देखील असते. त्यामुळे आज आपण पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची माहिती आपण घेणार आहोत.

१)श्री कसबा गणपती

हा गणपती पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते. ही स्वयंभू मूर्ती असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली असल्याची आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी श्री कसवा गणपती या मानाच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. सुरूवातीला मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधण्यात आला होता. आता येथे सभामंडपही बांधण्यात आला आहे. दरवर्षी पारंपारिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक गणेश चतुर्थीच्या दिवशी काढली जाते.
 
२) श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

मुळात श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. . म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचे दुसरे स्थान देण्यात आले आहे. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी १८९६ ला सुरूवात केली. यंदा सकाळी 10 वाजता श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणुक काढण्यात आली होती. ही मिरवणुक केळकर रस्त्यावरवरून सुरू झाली. त्यानंतर ती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराकडे आली. त्यानंतर बाप्पा मंडपात विराजमान झाले. मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही.
 
३) श्री गुरुजी तालीम गणपती

लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी श्री गुरुजी तालीम गणपती बसवण्यात आला. हा गणपती पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. पुर्वी हा गणपती तालमीत बसवला जात असे. मात्र आता तालीम नसल्याने हा गणपती मंडपात बसतो.

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस! (अधिक माहितीसाठी बातमीवर क्लिक करा)


४) श्री तुळशीबाग गणपती

पुण्यातला चौथा मानाचा गणपती म्हणजे श्री तुळशीबाग गणपती. हा गणपती उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात १९०० साली करण्यात आली. ह्या गणपतीची मूर्ती फायबरची आहे. ह्या गणपतीची आरास ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे करतात.

५) श्री केसरी गणपती

श्री केसरी गणपती हा पुण्यातला पाचवा मानाचा गणपती आहे. ह्या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात १८९४ मध्ये झाली. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. दरम्यान १९९८ मध्ये या गणपतीची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली होती.

दरम्यान पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी १०.२३ वा. प्राणप्रतिष्ठेला सुरूवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याआधी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून काढण्यात आली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.