महिला आरक्षण बिल! नव्या संसदेत मोदी सरकारचा पहिला ऐतिहासिक निर्णय!

19 Sep 2023 14:25:47
 womans
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, नवीन सभागृहाच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मी मोठ्या आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगत आहे की, आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल. हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. महिला आरक्षणाबाबत अनेक वर्षांपासून अनेक चर्चा होत आहेत. अनेक वादविवाद झाले. महिला आरक्षणाबाबत संसदेत यापूर्वीही प्रयत्न झाले आहेत. हे विधेयक १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आले. अटलजींच्या कार्यकाळात महिला आरक्षण विधेयक अनेकवेळा मांडण्यात आले, परंतु ते मंजूर करण्यासाठी डेटा गोळा करू शकले नाहीत, त्यामुळे ते स्वप्न अपूर्ण राहिले.
 
पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की,"ते काम... कदाचित अशा अनेक पवित्र कामांसाठी देवाने माझी निवड केली आहे. पुन्हा एकदा आमच्या सरकारने पावले उचलली आहेत. महिला आरक्षण विधेयकाला कालच मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या संविधान संशोधन करण्यासाठी विधेयक आणले आहे. या कायद्याअतर्गंत महिलांना लोकसभा आणि राज्यसभामध्ये ३३ टक्के जागा राखीव करण्यात येणार आहेत. यामुळे २०२४ नंतर लोकसभेत कमीत-कमी १८२ महिला खासदार निवडून येतील.
 
 
Powered By Sangraha 9.0