नाशिक जिल्ह्यात ९०६ गावात गावांमध्ये एकच गणपती!

    19-Sep-2023
Total Views |
Implement One Village One Ganapati

नाशिक : पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'एक गाव, एक गणपती' बसवण्याचा निर्णय नाशिक जिल्ह्यातील ९०६ गावांनी घेतला . त्यानुसार नाशिक येथे ९०६ गावात एकच गणपती बाप्पा विराजमान झालेत. तसेच नाशिक ग्रामीण भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. अतिरिक्त २ उपअधीक्षक, १० निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, ३५० अंमलदाराची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांसह १५०० पुरुष आणि ५०० महिला होमगार्डची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.


ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

'माझा बाप्पा येणार, घर अंगण त्याच्या आगमनासाठी सजणार', पर्यावरणपूरक आरास मी करणार. आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाला काही दिवसच उरले आहेत. घरोघरी तयारी सुरू झाली आहे. आपण केलेली बाप्पाची सजावट पर्यावरण पूरक असेल तर, तुम्ही हजारोंची बक्षिसे जिंकू शकता. 'दै. मुंबई तरुण भारत' तर्फे MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रोख, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रोख, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सरळ आणि सोप्पी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3RpZbSq या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी २८ सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल.

स्पर्धेची नियम व अटी :

१) उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी

२) श्रींच्या मूर्तीवरील रंग नैसर्गिक असावेत.

३) उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी

४)उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.

५) उत्सवात विजेचा अतिरेकी वापर न करता विजेची बचत करावी.

६) सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य

७) संपूर्ण उत्सवात सभोवतालच्या पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.

८) पर्यावरणाचे रक्षण करत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे ५ फोटो आणि आपण केलेली सजावट पर्यावरणपूरक कशी आहे, याबद्दलचे तपशील दिलेल्या लिंक वर आम्हाला पाठवा.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.