भारताचे कॅनडाला चोख प्रत्युत्तर; कॅनडाच्या उच्चायुक्तांना ५ दिवसात देश सोडण्याचे आदेश

19 Sep 2023 11:25:53
JASTIN 
 
मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताविरोधात वक्तव्य केले होते. याशिवाय, हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर कॅनडाने एका भारतीय राजनयिकाला देश सोडण्याचा आदेश दिला आहे.
 
बुधवारी भारतानेही कॅनडा सरकारला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "पंतप्रधान ट्रूडो यांचे आरोप निराधार आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधानांनी केलेली अशी विधाने कॅनडामध्ये आश्रय घेत असलेल्या खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्याच वेळी, बुधवारी सकाळी भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना बोलावले. कॅनडाच्या राजनयिक अधिकाऱ्याला भारतातून बाहेर काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, "संबंधित राजनयिक अधिकाऱ्याला पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे." हा निर्णय कॅनडाच्या राजनयिकाचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो."
 
 
Powered By Sangraha 9.0