मुंबई (विशेष प्रतिनिधी): वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना एमएचबी कॉलनी ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. एक सुकलेले वाघाचं कातडं आणि १२ वाघनखं या तस्करांकडून जप्त करण्यात आली आहेत.
वाघाची कातडी आणि नखांची तस्करी करून महाबळेश्वरहून काही तस्कर बोरीवली मुंबईत येणार असल्याची प्राथमिक माहिती गोपनीय सुत्रांकडून वनविभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. या सापळ्यातुनच सुरज कारंडे, मोहसीन जुंद्रे आणि मंजूर मानकर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वाघाची कातडी आणि नखे अशा तब्बल १० लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.