मुंबई : तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी आज एका कार्यक्रमात द्रमुक नेत्यांनी सनातन आणि हिंदू धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. राज्यपाल आर.एन.रवी म्हणाले की, "तेच लोक हिंदू धर्माच्या विनाशाबद्दल बोलत आहेत, ज्यांना देश तोडायचा आहे."
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी पुढे बोलताना म्हणाले की, "धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल, जे हिंदू धर्म नष्ट करण्याविषयी बोलत आहेत, त्यांचा शत्रू परकीय शक्तींशी हातमिळवणी करून हा देश तोडण्याचा अजेंडा आहे. हे लोक कधीही यशस्वी होणार नाहीत."
राज्यपाल आर.एन.रवी म्हणाले की, "दुर्दैवाने आपल्या समाजात सामाजिक भेदभाव आहे. समाजातील अनेक घटकांमध्ये भेदभाव केला जातो, परंतु हिंदू धर्म तसे करण्यास सांगत नाही. ही एक सामाजिक समस्या आहे आणि ही समस्या दूर करणे आवश्यक आहे."
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातनबाबत वादग्रस्त विधान केले होते. डेंग्यू आणि कोरोनाप्रमाणे सनातनला संपवायला हवे, असे उदयनिधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला.