Stock Market Updates: निफ्टी, सेन्सेक्स आपटले.मार्केट मध्ये थोडी मंदीची भावना

    18-Sep-2023
Total Views |

Stock
 
Stock Market Updates: निफ्टी, सेन्सेक्स आपटले.मार्केट मध्ये थोडी मंदीची भावना
 
मुंबई:आज BSE,NSE दोन्हीकडे स्तब्ध वातावरण पहायला मिळाले.क्लोजिंग बेलनंतर सेन्सेक्स २५० पूर्णांकांने तर निफ्टी इंडेक्स ५९ पूर्णांकांने कोसळला.गेले काही दिवस मार्केट तेजीत असताना आज मात्र नकारात्मक दिशा दर्शविणारे ठरले.निफ्टी 50 २०१२९ हून थोडा खाली आल्याचे दिसले.सेन्सेक्स ६७५९७ वर थांबला आहे.आयटी क्षेत्रातील शेअर्स आज मंदावले होते.विमा कंपन्यांच्या शेअर्समध्ये थोडी तेजी दिसली.
 
विशेष म्हणजे पब्लिक सेक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज बूम पहायला मिळाली.निफ्टी मधील १० बँकाने ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला आहे.पंजाब नॅशनल बँक,बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक चे शेअर्स आज टॉप गेनर राहिले.
 
दुसरीकडे विशेष म्हणजे एचडीएफसी शेअर १.९६ टक्यांने घसरून सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.एचडीएफसी व्यतिरिक्त आयडीएफसी, फेडरल बँक, बंधन बँक , कोटक महिंद्रा बँक हे शेअर्स आज टॉप लुजर राहिले आहेत.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.