मुंबई : विरोधी आघाडीतील नेत्यांची सनातन विरोधी भूमिकांमुळे आधीच वादात सापडली आहे. त्यातच आता कर्नाटकचे काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते टिळक लावण्यास नकार देताना दिसत आहेत. सिद्धरामय्या यांचा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की इंडी आघाडीचे लोक हिंदू धर्मावर आघात करून केवळ मतपेढीचे राजकारण करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हैदराबादमधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा आहे. पारंपरिक साडी नेसलेली एक महिला काँग्रेस नेत्यांचे स्वागत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती महिला टिळक लावून आणि आरती करून त्यांचे स्वागत करत आहे, पण जेव्हा सिद्धरामय्या येतात आणि ती महिला त्यांना टिळक लावण्यासाठी पुढे सरकते तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांना हाताने थांबण्याचा इशारा करतात.
यानंतर महिला आरतीसाठी पुढे आल्यावर त्यांनी नकार दिला. व्हिडिओमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह देखील सिद्धरामय्या यांच्यासोबत उभे असल्याचे दिसत आहे. ही दुसरी वेळ आहे, जेव्हा इंडी आघाडीच्या नेत्यांनी टिळक लावण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या या आघाडीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टिळक लावण्यास नकार दिला होता.
हा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “ममता दीदींनंतर आता सिद्धरामय्या यांनी टिळक लावण्यास नकार दिला आहे. टोपी घालणे ठीक आहे, पण टिळक लावणे योग्य नाही? पूनावाल म्हणाले की, या आघाडीच्या मुंबई बैठकीत हिंदू आणि सनातन धर्माला लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनी लिहिले, "उदयनिधी स्टॅलिनपासून ते ए राजापर्यंत, जी परमेश्वरपासून प्रियांक खर्गेपर्यंत, आरजेडीपासून सपापर्यंत - 'हिंदू विश्वासावर हल्ला करा' आणि व्होट बँकची मते घ्या अशी रणनीती आहे."