मुंबई : विरोधी आघाडीतील नेत्यांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विश्वास नसल्याचा दावा, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. विशेष म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारानेच विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याची कसरत सुरु करण्यात आलेली आहे.
२०२४ च्या निवडणूकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी, देशभरातील २८ विरोधी पक्षांनी मिळून इंडी नावाने आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत ३ बैठका पार पडल्या आहेत. पण अद्याप या आघाडीतील पक्षांना इंडी आघाडीच्या संयोजकाची नेमणूक करता आलेली नाही.
इंडी आघाडीच्या संयोजक पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्सुक आहेत. पण इंडी आघाडीने त्यांना समन्वय समितीत देखील स्थान दिलं नाही. याताच आता चिराग पासवान यांनी विरोधी आघाडीतील पक्षांना नितीश कुमार यांच्यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. चिराग पासवान यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांच्याविषयी नव्याने चर्चा सुरु झाली आहे.