पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहकार्य करणार : खा. सुप्रिया सुळे

    18-Sep-2023
Total Views |
NCP MP Supriya Sule In Parliament session

मुंबई :
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील भाषणात मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्याचे काम केले आहे. यावेळी संसदेतील भाषणात खा. सुळेंनी संसदेतील अधिवेशनासंबंधी सूचना केल्या आहेत. त्यात विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती त्यांनी करतानाच विरोधी पक्षाच्या मतांचा विचार करून विरोधी पक्षाला निर्णयांत सहभागी करावे, असे खा. सुळे म्हणाल्या. तसेच, सरकारकडून भ्रष्टाचारासंबंधी मुद्दयावर सहकार्य करण्यास तयार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

संसदेत त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, काँग्रेसने ६० वर्षांत काय केले. यावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या,तत्कालीन सरकारातले बव्हंशी नेते आताच्या सरकारमध्ये असून आम्ही देशाच्या विकासासाठी विचार करणार, असे खा. सुळे म्हणाल्या. त्याचबरोबर, संसदेतील कामकाजावर त्यांनी भाष्य केले. संसदेच्या कामकाजात प्रमुख विषयांवर दीर्घकाळ चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षाची मतेदेखील विचारात घेतली जावी अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
 
त्याचबरोबर, इतिहास याआधीही अनेक दिवस संसदेचे अधिवेशनं झाली आहेत. त्यानुसार, आता ही अधिवेशन झाली पाहिजे. तसेच, पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराविषयक मोहिमेत आम्ही सर्व विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याचबरोबर, आम्ही देशहितासाठी एकमेकांच्याविरोधात विचार करू शकत नसल्याचे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, समस्त बारामती मतदारसंघातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व खा. सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीच्या मंदिरात म्हणजेच, संसदेत राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसारच भाषण करतानाच मला भाषण करायची संधी दिल्याबद्दल लोकसभाध्यक्षांचे आभार मानले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.