'वॉल्ट डिस्नी जगातील दिशादर्शक ब्रँड'

मोहित सोमण

    18-Sep-2023
Total Views |

Disney
 
मुंबई तरूण भारत विशेष लेख : 'वॉल्ट डिस्नी जगातील दिशादर्शक ब्रँड '

मोहित सोमण
 
काही ब्रँड जगात उत्क्रांती करून जगाला हेवा वाटावा असा मार्ग सुचवत असतात.ब्रँडिग विश्व बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ' इंटिग्रेटेड अप्रोच). एका ठिकाणी प्रेक्षकांना ' लार्जर दॅन लाईफ' अनुभव व दुसरीकडे उपयुक्तता.या दोन्ही गोष्टींचा विचार करून उत्पादक आपले उत्पादन बनवतो.ब्रँड इमेज ही एक दिवसाची माया नाही.ग्राहकांच्या मनात स्थान,व चिन्ह घोळत राहणे हे कुठल्याही ब्रँडच्या यशाचे द्योतक आहे.
 
Brand Positioning हे एक व्यक्तीसापेक्ष नसून ती एक प्रकारची चिन्ह किंवा ब्रँडची ओळख असते.नकळतपणे त्या विशिष्ट प्रकारच्या ब्रँड बद्दल जनतेला आपसूकच प्रेमच नाही तर आस्थाही निर्माण होते.त्यातला अग्रणी ब्रँड म्हणजे वॉल्ट डिस्नी.जगात क्वचित असे लोक असतील ज्यांना हा ब्रँड माहिती नसेल.
 
'स्वप्नांची दुनिया' बनवणारा ब्रँड म्हणून डिस्नी प्रसिद्ध आहे.अगदी लहान मुलांपासून थोरल्या पर्यंत आजही तितकीच लोकप्रियता टिकवून ठेवणारा ब्रँड वॉल्ट डिस्नी ब्रँडचा लौकिक आहे.१९२३ साली डिस्नी स्टुडिओची स्थापना वॉल्ट डिस्ने व रॉय डिस्ने या बंधूंनी केली. वॉल्ट डिस्नी व वॉल्ट डिस्ने प्रोडक्शन या बॅनर खाली या दोघांनी या ब्रँडचे कामकाज सुरू केले.' कार्टून ' आणि ॲनिमेशन क्षेत्रात या ब्रँडने क्रांती घडवली.तंत्रज्ञानाचा वापर करून भौतिक विश्वाचा आनंद समाजाला देते या मूलभूत उद्दिष्टावर या कंपनीने मोठ्या प्रमाणात काम केले.पारिवारिक ' डिस्नीलॅंड' ही संकल्पना ऑस्ट्रेलिया पासून आईसलॅंड पर्यंत खूप चर्चेत आली.विशेषतः मिकी माऊस हे पात्र आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.१९४० नंतर आर्थिक तेजीनंतर डिस्नीने चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन, थीम पार्क सगळ्यांमध्ये आपली कक्षा रूंदावली.
 
अमेरिका, युरोपात घरा घरात डिस्नी म्हणजे ' बेंचमार्क ' निर्माण झाला.कंपनीच्या शेल्फ लाईफ मध्ये अडचणीही आल्या.परंतु ज्याला व्यावसायिक परिवर्तन म्हणतात अशा पद्धतीचे 'ट्रान्सफॉर्मैशन 'डिस्नीने केले.खुद्द वॉल्ट डिस्नी यांचे १९६६ साधी निधन झालं तरी कंपनी ८० चा दशकात कॉर्पोरेट क्षेत्रात स्थिरावली गेली.'सिनिक ब्युटी ' चा परिघात मर्यादित न राहता डिस्नीने प्रौढांसाठी देखील चित्रपट सुरू करण्याचे ठरवले.पब्लिकेशन,कनज्यूमर प्रोडक्टस मध्येही डिस्नीने हात पसरले.परिणामी येणाऱ्या काळात डिस्नीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रोडक्शन हाऊसेसशी हातमिळवणी करत पूर्वेकडील देशात आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला.आर्थिक दृष्टीने डिस्नी मोठा ब्रँड तयार झाला.सध्या मार्क पारकेर अध्यक्ष व बॉब इगर हे कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक आहेत.आजच्या घडीला डिस्नीची आर्थिक उलाढाल ८२ बिलियन युएस डॉलरहून अधिक आहे.एका कार्यक्रमात बोलताना बॉब इगर यांनी सर्वसमावेशकता,आणि सहिष्णुता कंपनीचा गाभा असल्याचे सांगितले होते.
 
एक ब्रँड ते डिस्नीलॅंड ही १९२३ ते २०२३ मधील आर्थिक बाजू सोडली तरीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डिस्नीची लोकांच्या मनातील ब्रँड व्हॅल्यू न मोजता येणारी आहे .एखादा उद्योग समुह अनेक उत्पादकांच्या स्पर्धेत असल्याने ब्रँड मोठा ठरतो हे सुत्र सर्वात कोणी मोडले असेल तर ते डिस्नीने.
 
एकाच एंटरटेनमेंट ब्रँड इको सिस्टीमला सुद्धा व्यवहारिक पायाभूत यश मिळते हा पायंडा डिस्नी कंपनीने मोडला.मार्केटिंग मध्ये एक संकल्पना प्रचलित आहे ती म्हणजे ' Strategic Marketing '.डिस्नीने युनिव्हर्सल स्ट्रेटेजीवर काम करत विविध डेमोग्राफिक समीकरणांवर चांगला अभ्यास केला.विषयांची निवड,कथेचा चोखंदळपणा, लागणारे तंत्रज्ञान, सादरीकरण व सर्वात महत्वाचे कथेची दमदार मांडणी.बच्चेकंपनी व मोठ्यांना एक समान विषय आवडू शकतो या साच्यात डिस्नी नेहमीच यशस्वी झाली.डोनाल्ड डक,ते स्वप्नातील परी आणि त्यातून निर्माण झालेली आभासी दुनिया हेच डिस्नीचा पथ्यावर पडले.
 
दुर्मिळतेतून ब्रँड घडत असतो.यासंबंधी डिस्नीचा यशस्वी 'सिक्रेट ' सुत्र कुठले असेल तर ते म्हणजे कंपनी ब्रँडहूनही अधिक कथेला व संकल्पनेला महत्व देणे जिथे दुसरीकडील कंपन्या मात्र ब्रँड आधी,कथा संकल्पना नंतर हळू गणित बघतात.परिणामी गणिते चुकत जातात.अमेरिकेत एक वाक्य प्रचलित आहे.'Disney dosent Just create movies'. It creates entire Universe.फक्त चित्रपट नाही तर डिस्नी विश्व उभारते.
 
एखादी घडलेली कथा सुद्धा नव्या रुपात प्रस्तुत करणे हे खूप आव्हानात्मक काम आहे.कथेचा विस्तार,त्यांचे अर्थकारण,संकल्पना यांची सांगड घालणे तितकेसे सोपे नाही.८० चा दशकातील कथा २०२३ मध्ये सांगण्यात डिस्नीचा हातखंडा आहे.काळाची गरज, ब्रँडची उपयुक्तता ओळखतो तोच ' जो जिता वही सिकंदर ' ब्रँड ठरतो.
 
मार्केट व्हॅल्युएशनचा विचार करताना डिस्नीने नेहमीच टिकाऊ विचार केला‌.पिक्सार,स्टार वॉर्स,मारवल स्टुडिओ इको सिस्टीम साठी डिस्नीचा ताळमेळ राखण्याचे कसब तर डिस्नीची ताकद आहे.भारतात देखील हळूहळू एक प्रेक्षक वर्ग निर्माण करत आज तर थ्रीडी,फोरडी तंत्रज्ञानात प्रदर्शित होऊन भारताच्या खेड्या,निम शहरात देखील डिस्नी वर्ल्ड चा पाया रोवला गेला आहे.भारतात जसे पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण राहिले त्यांचे इमेज स्केलिंग डिस्नीच करू शकले.त्यांनी पडता काळही पाहिला.अमेरिकन स्टॉक एक्सचेंज मध्ये गेल्या वर्षी शेअरचे भाव कोसळले असले तरी काही दिवसांत डिस्नीने जोरात वापसी केली.
 
९० चा दशकात सोनी पिक्चर्सशी टाय अप करून पसरलेली कार्टून इंडस्ट्रीसाठी डिस्नीची स्वतंत्र ३ चॅनेल आहेत.आपली कंपनी सेंच्युरी फॉक्सचा माध्यमातून हॉटस्टार कंपनीचे अधिग्रहण केले.डिस्नी प्लस हॉटस्टार नामांतरण झाल्यावर कंपनीची प्रवास लक्षणीय ठरला.मध्यंतरी जिओ सिनेमाने आयपील बिडिंग जिंकल्यावर एप्रिल ते जून तिमाहीत १२.५ मिलियन सबस्क्राईबर गमावले.परंतु फ्री क्रिकेट स्ट्रीमिंग झाल्यानंतर व कंटेंटचा पुरवठा वाढल्यानंतर पुन्हा एकदा सबस्क्राईबर डिस्नी कडे जाऊ लागलेत.या प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे नफा वाढवणे.अजून एक आव्हान म्हणजे कंटेंटवरील खर्चात नियंत्रण.
 
त्यामुळे डिस्नी हॉटस्टार ' Economies of Scale ', का 'Niche' रणनीती आखेल हे लवकरच कळेल.एकंदरही डिस्नी कंपनीच्या महसूलात व डिस्टब्युशन नेटवर्क मध्ये मोठे बदल होतील असे संकेत मिळत आहेत.
 
वरकरणी हे पाहिले तरी व्यवसायात काळाबरोबर किंबहुना काळाच्या पुढे पाऊले टाकत असते हे नाकारता येणार नाही.डिस्नीचा हा इतिहास हा प्रेरणादायक आहेच पण त्या पलीकडे एंटरटेनमेंट व मर्चंडायझिंग क्षेत्राला पूरक व मार्गदर्शक ठरेल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.