टाटा कॅपिटलने नेक्स्ट जनरेशन API फायनान्शिअल सोल्युशन्स लाँच केले

    18-Sep-2023
Total Views |

Tata Capital
 
टाटा कॅपिटलने नेक्स्ट जनरेशन API फायनान्शिअल सोल्युशन्स लाँच केले
 
मुंबई:टाटा कॅपिटल ही वित्तीय क्षेत्रातील आघाडीची कंपनी समजली जाते. अशातच कंपनीने नुकतेच युजर फ्रेंडली Application Programming Interface ( API) लाँच केले आहे.या फिनटेक क्षेत्रातील नेमकी गरज ओळखून तसेच वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन केलेले हे सॉफ्टवेअर हे बाजारात आणणार आहे. वित्तीय व्यवहारांकरिता हे सोल्युशन्स आपल्या भागीदारा सोबत डिजिटल सहयोग ठेवणे शक्य करणार आहे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 
'इनोव्हेशन, ट्रान्सफॉरमेशन' या उद्दिष्टांच्या जोडीने कंपनीने हे API सोल्युशन्स बनवले आहे.पेमेंट,कलेक्शन, इतर वित्तीय सुविधा या डिजिटल पेमेंटस मधून पुरवता येतील.रिटेल,कॉर्पोरेट दोन्ही प्रवर्गातील ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध होईल.
 
टाटा कॅपिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (डिजिटल अँड मार्केटिंग) अबोंटी बॅनर्जी म्हणाले,'टाटा कॅपिटलमध्ये आम्ही आधीच कर्ज मूल्य साखळीतील फिनटेक इकोसिस्टमसोबत जवळून काम करत आहोत.आमच्या एपीआय सोल्यूशन्सची सुरुवात ही भागिदारी अधिक सहकार्यात्मक आणि निर्बाध करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.एपीआयमुळे टाटा कॅपिटलचे सोल्यूशन्स सुलभ पद्धतीने थेट एकत्र एम्बेड होऊ शकतील. आम्हाला विश्वास आहे की यामुळे फिनटेक भागीदारांसह आणखी अनेक नवीन कल्पना जिवंत होण्यास मदत होईल आणि सतत नाविन्यपूर्ण प्रक्रियेस मदत होईल.'
 
टाटा कॅपिटल यासाठी एक पोर्टलचा वापर करणार आहे.या युजर फ्रेंडली पोर्टल मधून यात रजिस्ट्रेशन करून सुविधांचा वापर ग्राहकांना करता येईल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.