
धनलक्ष्मी बँकेचा शेअर ९ टक्यांने कोसळला
स्वतंत्र संचालक श्रीधर कल्याणसुंदरम यांचा राजीनामा
बंगलोर:धनलक्ष्मी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ( DNBS) बँकेचे शेअर ९ टक्यांनी कोसळले आहेत.बँकेचे स्वतंत्र कार्यभार असलेले संचालक श्रीधर कल्याणसुंदरम यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीतील अंतर्गत संघर्ष जाहीरपणे समोर आला.बँकेची आर्थिक स्थिती व बँकेचे इश्यू करण्याचे हक्क यातील मतभिन्नतेमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.सकाळी साडेदहाच्या सुमारास बँकेचे शेअर ३.२५ टक्यांनी घसरून २८.२० रुपयांपर्यंत आल्याचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये केरळातील मुख्यालय थिसूर येथे स्वतंत्र प्रभारी संचालक पदावर नियुक्ती झाली होती.बँकेमधील व्यवहारांचा नियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काढण्यात आल्याचा आरोप कल्याणसुंदरम यांनी बँकेवर केला आहे.
अद्याप बँकेकडून या विषयी कोणतेही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर अजून पुढे आलेली नाही.