ज्युपिटर हॉस्पिटलचा इश्यूला 'प्रिमियम' प्रतिसाद. ३० टक्के अधिक किंमत

प्रिमियम भावात सुमारे ९६० रुपयांपर्यंत रॅली

    18-Sep-2023
Total Views |
.
Jupiter
 
ज्युपिटर हॉस्पिटल इश्यूला 'प्रिमियम' प्रतिसाद. ३० टक्के अधिक किंमत
 
प्रिमियम भावात सुमारे ९६० रुपयांपर्यंत रॅली 
 
मुंबई:मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून प्रख्यात असलेले ज्युपिटर हॉस्पिटलने आज इक्विटी मार्केट मध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. मल्टी स्पेशालिटी ज्युपिटरचे अनेक ठिकाणी हॉस्पिटलचे जाळे आहे.BSE या लिस्टिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.मूळ किंमत (इश्यू प्राईज)म्हणून ७३५ रुपयांना ज्युपिटरचा शेअर असला तरी तब्बल ३० टक्के प्रिमियम भावात सुमारे ९६० रुपयांपर्यंत रॅली झाला आहे.
 
अखेरचा सत्रात तर ३९.९० टक्यांने वाढून १०२८.३० रुपयांपर्यंत शेअरची किंमत वाढली आहे.NSE मध्ये ९७३ रुपये प्रति शेअर मूल्यात या शेअरचे ट्रेडिंग झाले.इश्यू प्राईजचा सुमारे ३२.३८ टक्यांने या शेअरची ' प्रिमियम ' भावात विक्री नोंदवली गेली आहे. कंपनीचे मार्केट मूल्य ६७१५ कोटी रुपयांचे आहे.याआधी ज्युपिटरचा आयपीओलाही एंजल गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.६९५ -७३५ रुपये प्रति शेअरचा भावात ज्युपिटरचा आयपीओ उघडला गेला.
 
ज्युपिटरचे ठाणे, पुणे, इंदोर या भागात इस्पितळांचे चेन नेटवर्क आहे.लवकरच डोंबिवली येथेही ज्युपिटर हॉस्पिटल उघडण्यात येणार आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.