'जिओ एअर फायबर' गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर होणार लाँच

18 Sep 2023 18:00:59
Jio Air Fiber Launched On Ganesh Chaturthi

मुंबई :
'रिलायन्स जिओ'ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'जिओ एअर फायबर' लाँच करणार आहे. यामाध्यमातून रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अद्ययावत सुविधा पुरविणार आहे. 'जिओ एअर फायबर'ला १.५ जीबीपीएसपर्यंतचा स्पीड मिळणार आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना जलदगतीने इंटरनेटसेवा सुविधा पुरविली जाणार आहे.

दरम्यान, 'जिओ एअर फायबर'ला पॅरेंटल कंट्रोल, वाय-फाय ६ सपोर्ट आणि इंटीग्रेटेड सिक्युरिटी फायरवॉलसारखे फीचर्स देण्यात आले असून पॉईंट टू पॉईंट रेडिओ लिंक्सचा वापर करण्यात आला आहे. या पॉईंट टू पॉईंट लिंक्समुळे वायरलेस पध्दतीने इंटरनेट उपलब्ध होणार आहे. सध्या 'जिओ फायबर' १ जीबीपीएसचा स्पीड जिओ ग्राहकांना मिळतो आहे.




Powered By Sangraha 9.0