गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

18 Sep 2023 16:15:13
Free Health Checkup Camp In Gurukulam

पुणे :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदग्राम गुरुकुल आश्रम येथील लहान मुलांना मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप, खाऊवाटप कार्यक्रमाचे आयोजन भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्या (निमंत्रक), पद्मनिधी महिला संघटनेच्या अध्यक्षा डॉ. तेजस्विनी अरविंद-गोळे यांनी केले.

विद्यार्थ्यांनी हिंदू वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भजन व वाद्य वाजवून स्वागत केले. यावेळी डॉ. गोळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या यांच्या कामांमधून, योजनेद्वारे ते कसे घरोघरी पोहोचले आहे व २०२४ मध्येदेखील पुन्हा सरकार येणार असल्याचे नमूद केले. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना विश्वनेता म्हणून ओळखले जाते, असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांसमोवत केक कापून व खाऊ वाटला. यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजप पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, उपसरपंच समीर तरवडे, ग्राम सदस्य समीर तरवडे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जगदाळे, अपर्णा देवलालिकर आणि गुरुकुलममधील विद्यार्थी उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0