मुंबई : रामदेव बाबा यांच्या ‘मोक्ष कसा मिळेल’ या प्रवचनाला विरोधकांनी ‘बाबांचा मोक्ष उद्योग’ असा अग्रलेख सामना वृत्तपत्रात लिहिला होता. सामना वृत्तपत्राचा इतिहास आणि आजची परिस्थिती ही डबघाईला आल्याने बाबारामदेव यांच्याकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का ? या आशेने त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी सामनात अग्रलेख लिहिण्यात आला आहे,'' असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आ. नितेश राणे म्हणाले की, ''९० च्या दशकामधील दाऊद आणि छोटा शकील त्यांची गँग बॉलीवूड अभिनेते, बिल्डर्स नामांकित व्यक्तींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत असे त्याचप्रमाणे आजच्या वेळेला सामना पेपरची परिस्थिती बिकट असल्याने तसेच त्यांना सरकार कडून कोणताही महसूल मिळत नसल्याने रामदेव बाबा यांच्या पतंजली प्रॉडक्टचे काही ऍड, किंवा महसूल मिळेल या आशेने रामदेव बाबा यांचा अग्रलेख लिहून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सामनातुन करण्यात आला,'' असा आरोप राणेंनी केला आहे.