भिवंडी (महेश जाधव) : बोबडे बोल बोलायच्या वयात भिवंडी येथील साईराज या छोट्या मुलाने कोरस देणार्या आपल्या लहान गोंडस बहिणीसह गायलेले हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. रिक्षा स्टॅण्ड, एसटी बससह रेल्वेत बाहुगर्दीत हे गाणे मोबाईलवर वाजत आहे. हे गाणे आपल्या घरातील लहान मुले बोबड्या बोलीत सतत गुणगुणतात. तेव्हा या गाण्याचे कुतूहल अजून वाढत जाते आणि या गाण्याचा व्हिडिओ प्रत्यक्ष पाहण्याचा मोह काही आवरत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या निरागस लहान मुलांचे हावभाव पाहून हसू आवरत नाही. संगीत परंपरेचा पिढीजात वारसा आपल्याला लाभल्याचा आव आणून ही मुले बिनधास्त हे गाणे सादर करीत आहेत. गणपती हा शब्द उच्चारता न आल्याने साईराज हा पाच वर्षांचा मुलगा तिथे ‘गम्पती’ म्हणतो आणि ऐकणार्यांना हसू आवरता येत नाही. त्यातच कमी की काय म्हणून त्याची छोटी लहान बहीण एका अनुभवी गायकासारखी त्याला कोरस देते आणि हे पाहून हास्य कल्लोळ होतो.
गणेशोत्सवासाठी कोकणात चाललेले गणेशभक्त गाडी सुटताना ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणतात आणि बाकीचे सर्व भक्तगण ‘मंगलमूर्ती मोरया’ म्हणून त्याला दुजोरा देतात. ही पिढीजात परंपरा आहे. आता या उद्घोषणेनंतर गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी या गाण्याची भर पडली आहे. मंगलमय वातावरण निर्माण करून गावाला चाललेल्या गर्दीतून अचानक माझा पप्पांनी गणपती आणला, हा सूर निघतो आणि सर्वजन पुढे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, म्हणून सुरात सूर मिसळतात. लहान मुलांनी हे गाणे गायल्यामुळे घराघरातील छोटी मुले या गाण्यात रममान होत आहेत आणि नकळत घराच्या सर्व मंडळींना त्यात सामील करून घेत आहेत. रडणार्या लहान मुलांना गप्प करण्यासाठी, त्याचे मन वळवण्यासाठी त्यांच्या आईंना हे गाणे एक रामबाण इलाज ठरेल. शिवाय, या गाण्यावर कोकणात विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे हजारो पाय थिरकतील व सर्वांच्या मनोरंजनाच्या पसंतीस, हे गाणे उतरेल. शिवाय, ही दोन्ही भावंडे बालवयात प्रसिद्धीच्या झोतात जातीस व पुढे मोठे झाल्यावर कलाकार होतील. एवढे मात्र निश्चित.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
'माझा बाप्पा येणार, घर अंगण त्याच्या आगमनासाठी सजणार', पर्यावरणपूरक आरास मी करणार. आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाला काही दिवसच उरले आहेत. घरोघरी तयारी सुरू झाली आहे. आपण केलेली बाप्पाची सजावट पर्यावरण पूरक असेल तर, तुम्ही हजारोंची बक्षिसे जिंकू शकता. 'दै. मुंबई तरुण भारत' तर्फे MPCB प्रस्तुत '
MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रोख, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रोख, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सरळ आणि सोप्पी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3RpZbSq या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी २८ सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल.
स्पर्धेची नियम व अटी :
१) उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी
२) श्रींच्या मूर्तीवरील रंग नैसर्गिक असावेत.
३) उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी
४)उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.
५) उत्सवात विजेचा अतिरेकी वापर न करता विजेची बचत करावी.
६) सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य
७) संपूर्ण उत्सवात सभोवतालच्या पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
८) पर्यावरणाचे रक्षण करत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे ५ फोटो आणि आपण केलेली सजावट पर्यावरणपूरक कशी आहे, याबद्दलचे तपशील दिलेल्या लिंक वर आम्हाला पाठवा.