पुण्याच्या ससून रुग्णालयात रोबोट करणार शस्त्रक्रिया!
17-Sep-2023
Total Views |
मुंबई : अनेकदा शासकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात काही सुविधा अपुऱ्या असतात अशा तक्रारी अनेकदा येत असतात. परंतु आता शासकीय रुग्णालयांना कोणी कमी लेखू नये अशी गोष्ट पुण्यात घडली आहे. पुणे शहरातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राज्यात एका नव्या पद्धतीची शस्त्रक्रिया केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एका रुग्णाला गुडघ्याचा त्रास होता. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमधील गंभीर ऑस्टियो आर्थरायटिसमुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना चालणे ही अवघड झाले होते. म्हणून डॉक्टरांनी त्यांना गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
आर्थिक अडचणींमुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयात त्यांचावर 'क्युविस' रोबोटद्वारे टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
महाराष्ट्रात प्रथमच या पद्धतीची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे गुडघ्यातील सॉफ्ट टिश्यू लवकर बरे होतात. तसेच या शस्त्रक्रियेमुळे कमी वेदना होतात. यामुळे आता गरीब आणि सर्वसामान्य रुग्णावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी पैशात शस्त्रक्रिया करता येणार आहे.