मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा नवा संकल्प!

    17-Sep-2023
Total Views |

eknath shinde


मुंबई :
'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना' निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी शहिद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुधीर मुनगंटीवर, इम्तियाज जलील, अंबादास दानवे आणि इतर नेत्यांनी हजेरी दर्शवली होती.


या ऐतिहासिक दिवसाबद्दल शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज या संघर्षमयी इतिहासाची आणि रोमहर्षक लढ्याची पान आठवणींमद्धे चाळली जात आहेत. या लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. योगायोगाने आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आहे आणि मोदीजींनी सतत आपल्याला विकासाची आणि प्रगतीची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण अशी शपथ घेऊया की, मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे आणि विकासाचे नवे पर्व मराठवाड्यात सुरू झाले पाहिजे, अशाप्रकारची आपण संकल्पना करूया. चौफेर प्रगतीचा हा नवा मुक्तीसंग्राम आपण सुरू करूया.
 
 
तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण झाले. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली की, 'स्वतंत्र भारताचे नागरिकत्व देणाऱ्या आणि वैभवशाली महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू.हा मुक्तीसंग्राम अनेक ध्येयवादी स्वतंत्र सैनिकांच्या अमूल्य बलिदानातून आणि जनतेच्या सक्रिय पाठिंब्यातून सिद्ध झाला आहे. याची आम्ही कृतज्ञापूर्वक जाणीव ठेऊ. सार्वभौम भारताचे नागरिक म्हणून महाराष्ट्र धर्म पाळताना मराठवाड्याच्या भूमीला समृद्ध करण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षात सदैव आम्ही सानंद वचनबद्ध राहू.'
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.