लव्ह जिहाद: २० वर्षीय तरुणी ठरली ५१ वर्षीय नबी खानच्या वासनेची शिकार!

    17-Sep-2023
Total Views |
love-jihad-in-raipur-chhattisgarh-elderly-muslim-man-rape-hindu-girl-abortion

रायपूर : छत्तीसगडमध्ये ५१ वर्षीय नबी आलम खान याने एका मुलीसोबत ‘लव्ह जिहाद’ केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पीडितेवर आधी बलात्कार करण्यात आला. नंतर आरोपीच्या पत्नीनेच पीडितेला गर्भपात करण्यास भाग पडले.
 
रायपूरमधील ‘लव्ह जिहाद’ घटना
 
हे प्रकरण रायपूरचे आहे. जिथे ग्रिल बनवण्याचे काम करणाऱ्या नबी आलम खानने ब्युटीशियन म्हणून काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला फसवले आणि आधी तिच्यावर बलात्कार केला, नंतर तिला गप्प ठेवण्यासाठी लग्नाचे वचन दिले. तिच्यासाठी वेगळे राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्याला हव तसे तो स्वतां: ची वासना भागवत राहिला. एवढेच नाही तर त्याने पीडित मुलीचे नाव बदलून 'तरन्नुम' केले.
 
दरम्यान आरोपीचे लग्न झाले होते. त्याला मुलंही आहेत. मात्र तरी ही त्यांने हे दृषकृत्य केले. दरम्यान, पीडित तरुणी गरोदर राहिली. त्यानंतर आरोपीची पत्नी आणि आरोपी दोघेही पीडित तरुणीवर अत्याचार करू लागले. तसेच आरोपीच्या पत्नीने पीडितेचा गर्भपात ही केला.
 
ही तरुणी दुर्गची रहिवासी असून ती रायपूरमधील एका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. येथेच नबी आलम खानने तिला काम देण्याचे आणि अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्याने पीडितेला तरन्नुम हे मुस्लिम नावही दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक पोलिसांनी पुष्टी केली आहे की आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये पीडितेचे नाव 'तरन्नुम' म्हणून सेव्ह केले आहे.
 
दरम्यान गर्भपातानंतरही मुलीवर घरच्यांचा दबाव कायम होता. नबी आलम खान यांची पत्नी आणि मुलांनीही पीडितेला मारहाण केली. सर्व काही असह्य झाल्यावर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.