नवी दिल्ली ः मणिपूरमध्ये चार महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून, आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू, तर एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मणिपूरचे पोलीस महानिरीक्षक (ऑपरेशन्स) आय. के. मुइवाह यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितले की, “मणिपूरमधील परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, सुरक्षादले आवश्यक ती सर्व कार्यवाही करीत आहेत. राज्य पोलीस, केंद्रीय दले आणि नागरी प्रशासन सामान्य स्थिती परत आणण्यासाठी २४ तास प्रयत्न करीत आहेत. “मे महिन्याच्या सुरुवातीला हिंसाचार सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत १७५ लोक ठार झाले असून, अद्याप नऊ जण बेपत्ता आहेत. त्याचवेळी १ हजार, १०८ जखमी झाले, तर सुमारे ३२ लोक बेपत्ता आहेत,” असे ते म्हणाले.