‘अर्पिता’च्या तीन बछड्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नामकरण

17 Sep 2023 22:04:45
Latest News on Siddharth Garden Zoo


 छत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता. त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


Powered By Sangraha 9.0