छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

17 Sep 2023 12:04:16
Eknath Shinde 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरुन जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असताना बेकायदेशिररित्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनरचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. तो पूर्णपणे बेकायदेशिररित्या घेतला गेला होता. त्यामुळे आम्हाला हा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला."
 
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने काल राज्य मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय घेतला. कालच्या मंत्रिमंडळामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0