बंगलोर : एका दलित महिलेने कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री डी सुधाकर यांच्यावर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी डी सुधाकर यांच्यावर बेंगळुरू येथील येलहंका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये पीडितेने म्हटले आहे की, मंत्री सुधाकर त्यांच्या ३०-४० साथीदारांसह ९ सप्टेंबर २०२३ रोजी बेंगळुरूच्या येलहंका भागातील केएचबी कॉलनीमध्ये असलेल्या एका निवासी भूखंडावर जेसीबी घेऊन पोहोचले होते. त्यावेळी पीडिता घरी उपस्थित नव्हती. यानंतर मंत्री आणि त्यांच्या साथीदारांनी भूखंडाची तोडफोड सुरू केली.
पीडितेने पुढे सांगितले की, जेव्हा तिला हा प्रकार समजला आणि ती विरोध करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली आणि मंत्र्याने जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पीडितेने शेजारच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचेच सरकार आहे.