“स्मशानात लागणारी लाकडं मी…”, नाना पाटेकरांनी केले महत्वाचे विधान

    16-Sep-2023
Total Views |

nana patekar 
 
 
मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला द वॅक्सिन वॉर चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून पल्लवी जोशी चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, यावेळी नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेत एक महत्वाचे विधान केले आहे. नाना पाटेकर असं म्हणाले की, “स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत”. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
 
काय म्हणाले नाना पाटेकर?
 
“मला माहित आहे की एक दिवस माझा मृत्यू होईल. माझा मृत्यूवर विश्वास आहे. त्यामुळे मी मला कमाई, प्रसिद्धी, आपल्यालाच सगळं कसं मिळेल? या गोष्टींमध्ये रस उरलेला नाही. जी लोकं असा विचार करतात की आम्ही मरणारच नाही ते सगळं साठवत राहतात, आणखी कसं मिळेल याचा विचार करत राहतात. मला माहित आहे की माझ्या मृत्यूनंतर मला १२ मण लाकडं लागणार आहेत. तेवढीच लागणार आहेत. ती माझी अखेरची मालमत्ता असणार आहे. मी माझ्या चित्रपटातही हा संवाद वापरला आहे. मैने अपनी लकडी जमाँ कर के रखी है.. मी खरंच लाकडं गोळा करुन ठेवली आहेत. तर मी त्याला म्हणतो, ‘बेटे मैने अपनी लकडी जमा कर रखी है.. और वो सुखी लकडी है. तुम भी गिली लकडी इस्तेमाल मत करना. लोग जमा होंगे..धुआँ आयेगा दोस्त लोग, अगलबगल के लोगोंके आँखमे जाएगा और मरते वक्त गलतफैमी होगी मेरे लिये रो रहें है.’ हे आयुष्याचं वास्तव आहे. मृत्यूनंतर कुणीही तुम्हाला लक्षात ठेवत नाही.”
 
नानांनी यावेळी कवितेचे उदाहरण देत म्हटले, “मराठीत भा. रा. तांबे यांची कविता आहे जन पळभर म्हणतील हाय हाय! लोक थोडे दिवस शोक करतील नंतर विसरुन जातील. ते आवश्यकही आहे. लोक विसरतातच हे वास्तव आहे असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण नंतर माणूस स्वतःची समजूत घालतो. आजही मला वाटतं की माझी आई आहे. मृत्यूनंतर काय होईल तर माझी आणि माझ्या आईची भेट होईल. आम्ही सात भावंडं होतो. त्यातले सहा जण गेले मी राहिलो. आई वडील नाहीत, भाऊ बहिणी नाहीत. त्यामुळे मी आता त्या दुनियेचा झालो आहे. तुम्ही किती पैसे किती जमवणार? आणि इतके पैसे जमवून काय करणार?”, असा प्रश्न देखील नाना पाटेकरांनी विचारला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.