कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना टोल माफी

    16-Sep-2023
Total Views |

ganeshutsav


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना शनिवार, दि. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्यावतीने बहुप्रतीक्षित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी घाट परिसरातील एकल मार्गिकेचे उद्घाटनदेखील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्या पाठोपाठ टोल माफीचादेखील निर्णय झाल्याने कोकणवासीयांना शासनाकडून दुहेरी लाभ मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरितादेखील ग्राह्य धरण्यात येईल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.