'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

16 Sep 2023 15:57:16
State Bank of India Probationary Officer Recruitment 2023
 
मुंबई : 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मधील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. "प्रोबिशनरी ऑफिसर" या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून "प्रोबिशनरी ऑफिसर" पदाच्या एकूण २ हजार जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत दि. २७ सप्टेंबर २०२३ असणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती सुरू असून एसबीआयने २ हजार रिक्त जागांच्या भरतीची घोषणा केली आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.



Powered By Sangraha 9.0