मुंबई : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून यासाठी दि. २० सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करायचे आहेत.
या भरतीच्या माध्यमातून रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा गार्ड, यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II पदांच्या एकूण ०७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.