परवानगी नसतानाही एमआयएमने काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला!
16-Sep-2023
Total Views |
मुंबई: एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श पतसंस्था ठेवीदारांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडविले आहे. विना परवागनगी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रोपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे.अशी मागणी आमदार जलील यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तर इम्तियाज जलील यांना देखील पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि जलील यांच्यात देखील झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला आहे.
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, "आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे निलामी करुन गोरगरीब, वयोवृद्ध, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, रुग्णालयात भरती ठेवीदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळ्यातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे." अशी मागणी जलील यांनी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.