दुबईच्या लग्नाला जाणं बॉलिवूड कलाकारांच्या आलं अंगाशी! 'या' सेलिब्रिटींना ईडी पाठवणार समन्स?

    16-Sep-2023
Total Views |
 
ED and bollywood
 
 
मुंबई : काही दिवसांपुर्वी महादेव बुक नावाच्या ऑनलाइन बेटिंग ॲपचे मोठे प्रकरण समोर आले. या ऑनलाइन ॲपअंतर्गत बेकायदेशीर सट्टेबाजीचा खेळ सुरू होता. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या छापेमारीत तपास यंत्रणेने ४१७ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. आता या प्रकरणात ईडीच्या रडावर अनेक बॉलिवूड कलाकार, गायक आणि राजकीय नेत्यांची चौकशी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ॲप प्रकरणात पुलकित सम्राट, सनी लिओन, भाग्यश्री अशा मनरोंजनसृष्टीतील १४ कलाकरांची नावे पुढे येत आहेत. हे सर्व कलाकार महादेव बुक बेटिंग ॲप चालवणाऱ्या आरोपीच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी आले होते.
 
महादेव ॲप चालवणाऱ्या सौरभ चंद्राकरचेन फेब्रुवारीत UAE मध्ये लग्न झाले. या ग्रँड लग्नासाठी त्याने अनेक बॉलिवूड कलाकार, गायक आणि अनेक बड्या लोकांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले होते. सौरभ चंद्राकरच्या लग्नात या सर्व कलाकारांना कोट्यवधी रुपये मानधन देण्यात आलं होतं. पण आता त्याच्या लग्नात परफॉर्म करणं कलाकारांना महागात पडू शकतं अशी चर्चा रंगली आहे. ईडी लवकरच या कलाकारांना समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
 
महादेव ॲपच्या आरोपीच्या लग्नात कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली
 
टाइगर श्रॉफ, नुसरत भरूचा, सनी लिओनी, अली असगर, विशाल ददलानी, एली अवराम, भारती सिंह, भाग्यश्री, कृति खरबंदा, राहत फतेह अली खान, कृष्णा अभिषेक, नेहा कक्कड, पुलकित सम्राट, आतिफ असलम अशा १४ कलाकारांची नावे लग्नात परफॉर्म केलेल्या कलाकारांमध्ये सामिल आहेत. या सर्व कलाकारांना मुंबईतील एका इव्हेंट कंपनीद्वारे मानधन देण्यात आलं असल्याची माहिती आहे. त्याशिवाय महादेव ॲपच्या प्रमोटर्सनी २०० कोटींच्या जवळपास पैसे या लग्नात उडवले असल्याचीही माहिती समोर येत आहे. लग्नात पाहुण्यांना नागपूर ते यूएई जाण्यासाठी खास प्रायव्हेट जेट्सचा वापर करण्यात आला होता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.