मुंबईकरांची कोंडीतून सुटका होणार! लोअर परळ पूल सोमवारपासून खुला

15 Sep 2023 17:40:36

lower parel

मुंबई :
गेल्या पाच वर्षापासून बंद असलेला लोअर परळ उड्डाणपुल १८ सप्टेंबर, २०२३ पासून लोअर परळहून करीरोडकडे जाणाऱ्या एका मार्गाने सुरू करण्यात येणार आहे. प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परळच्या रहिवाशांसाठी, तसंच लोअर परळमध्ये नोकरीसाठी दररोज येणाऱ्यांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.

रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे उड्डाणपूल धोकादायक असल्याचे जाहीर केले. यानंतर २४ जुलै, २०१८ पासून वाहन वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी पूल बंद करण्यात आला होता. मात्र पूल बंद करुन महिना उलटला तरी पुलाचं काम सुरु झाले नाही.पूल बंद असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.
 
लवकरात लवकर काम सुरु करुन पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्याची मागणी नागरिक करत होते. परंतू पूल सुरू करण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरीस वारंवार देण्यात येणाऱ्या मुदतवाढी विरोधात लोअर परळ उड्डाणपूल नागरिक कृती समितीने 'लोअर परळ उड्डाणपुलाची सहल' नावाने १३ सप्टेंबर, २०२३ रोजी आंदोलन केले. यावेळी गणेशोत्सावाधी संपूर्ण उड्डाणपूल खुला करण्याची मागणी करण्यात आली.

 
लोअर परळचा हा उड्डाणपुल लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी यांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे पूल एका मार्गाने सुरू केल्यामुळे गणेशोत्सवात होणाऱ्या वाहतूक कोंडीत थोड्या प्रमाणात घट होणार आहे. तसेच ऐन गणेशोत्सवात पूल सुरू होणार असल्यामुळे लालबाग, परळच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 

 
Powered By Sangraha 9.0