मुंबई : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणी गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाली.
पहिल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचे आमदार हजर होते. शिवसेना आमदारांनी केलेल्या मागणीनंतर आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. उबाठाच्यावतीने देवदत्त कामत आणि असिम सरोदे यांनी तर शिवसेनेकडून अनिल सिंग आणि निहार ठाकरे यांनी बाजू मांडली.