पत्रकार नव्हे, राहुल गांधी यांचा बहिष्कार करा : डॉ. संबित पात्रा

15 Sep 2023 19:26:28
Sambit Patra on Rahul Gandhi
 
नवी दिल्ली : काँग्रेसप्रणित आघाडीने १४ पत्रकारांची यादी जारी करून त्यांच्या बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खरा बहिष्कार राहुल गांधी यांचा करण्याची गरज असल्याचा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत लगाविला आहे.

पत्रकार परिषदेत संबित पात्रा म्हणाले, ज्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे ते म्हणजे राहुल गांधी. ज्या पत्रकारांवर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे, त्यांच्यासोबत उद्या गैरप्रकार घडला तर त्यास जबाबदार कोण, याचे उत्तर काँग्रेसने देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रश्न विचारणाऱ्यांवर बहिष्कार टाकणे, याद्वारे काँग्रेसची खरी भूमिका देशासमोर आल्याचेही पात्रा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीदेखील काँग्रेसवर टिका केली आहे. ते म्हणाले, काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित आघाडीचा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर विश्वास नाही. भाजपविरोधाची भूमिका घेणाऱ्याही अनेक वृत्तवाहिन्या आणि पत्रकार आहेत. मात्र, भाजप असा बहिष्कार कधीही टाकत नाही. मात्र, आणिबाणीपासूनच वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या काँग्रेसचा हाच खरा चेहरा आहे, असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0