छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या दि. १६ सप्टें. रोजी मंत्रीमंडळीची बैठक पार पडणार आहे. सात वर्षानंतर संभाजीनगरमध्ये मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. यावेळी मराठवाड्यासाठी खुशखबर मिळेल, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळाची बैठक, सिंचन आणि अन्य खात्यांसाठी एकूण ४० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रूम्स बुक करण्यात आले आहेत. रामा हॉटेसमधील एकूण ३० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री या काळात वास्तव्य करणार आहेत. तसेच, शहरातील ताज हॉटेलमध्ये ४० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सचिव वास्तव्य करतील.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.