नवी दिल्ली : हरियाणातील नूह येथे ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारापूर्वी समाजमाध्यमांवर चिथावणीखोर पोस्ट टाकल्याबद्दल काँग्रेस आमदार मामन खान यास गुरुवारी राजस्थानमधून पोलिसांनी अटक केली. खान यास एसएआयटी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीने यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी नूहच्या फिरोजपूर झिरका विधानसभा मतदारसंघातील आमदार मामन याने हिंसाचारासाठी लोकांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली नोटीस बजावली होती आणि त्यांना 31 ऑगस्ट रोजी तपासात सामील होण्यासाठी बोलावले होते.
नोटीसला उत्तर देताना आमदाराने ते आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. त्यानंतर पोलिसांनी दुसरी नोटीस 5 सप्टेंबर रोजी दिली आणि 10 सप्टेंबर रोजी त्यांना तपासात सहभागी होण्यासाठी नूह पोलिस लाईन्स येथे बोलावले, परंतु ते तेथे हजर झाले नाही. मामन याने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाची चौकशी उच्च अधिकार्यांच्या देखरेखीखालील एसआयटी मार्फत करावी, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.