बॉम्बे डाईंगचा जमीनीचा ५२०० कोटींचा सौद्याचा प्रस्ताव मंजूर.
वरळीतील २२ एकर जागा ५२०० कोटींना विकणार. २० टक्यांने शेअर उसळले
मुंबई :14 सप्टेंबरला बोर्ड ऑफ डायरेक्टर बैठकीत 22 एकर जागा विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.वरळी येथील जागा तब्बल 5200 कोटींना विकली जाणार आहे.गोईसु रिअल्टीला ही जापनीज कंपनी ही जागा विकत घेणार आहे.सुमिटोमो रिअल्टी कंपनीची गोईसु ही उपकंपनी ( Subsidiary) आहे.
हे पैसे दोन टप्यात बॉम्बे डाईंगला दिले जातील.पहिले 4675 कोटी व काम झाल्यानंतर 525 कोटी देण्यात येणार आहेत.कंपनी यातून सगळ्या प्रकारची थकबाकी भरणार असल्याचे समजते.काल क्लोजिंग बेलनंतर बॉम्बे डाईंगचा शेअर १५३ रुपये प्रति शेअर्स पर्यंत पोहोचल्याने २० टक्यांने शेअर वधारला आहे.
वाडिया ग्रुपची बॉम्बे डाईंग ही खूप मोठी जुनी कंपनी आहे. या तिमाहीत कंपनीने १०५० कोटींचा नफा दर्शविला होता.