मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज (१५ सप्टें.) छत्रपती संभाजीनगरच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. निपाणीमध्ये आदित्य ठाकरे दाखल होतील. त्यानंतर या दौऱ्याला सुरुवात होईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
यामध्ये ते छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली आहे. या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे उद्या नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.