पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’महिला-नेतृत्व विकास’ ही संकल्पना मांडली. तेव्हा महिला सक्षमीकरणाच्या कथेला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा अभिनव दृष्टिकोन आता ‘जी २० एम्पॉवर’च्या सामायिक शब्दकोशाचा भाग बनला आहे. याने महिलांचे निव्वळ सक्षमीकरण करण्यावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर जिथे महिला केवळ लाभार्थी नसून, विकासाच्या नेत्यादेखील आहेत, असे वातावरण निर्माण केले आहे.
" जी २० एम्पॉवर’ हा एक जागतिक उपक्रम आहे. जो ‘जी २०’ राष्ट्रांमधील सरकारी संस्था आणि खासगी संस्थांना शिक्षण आणि आर्थिक सहभागाद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एकत्र आणतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’महिला-नेतृत्व विकास’ ही संकल्पना मांडली. तेव्हा महिला सक्षमीकरणाच्या कथेला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा अभिनव दृष्टिकोन आता ‘जी २० एम्पॉवर’च्या सामायिक शब्दकोशाचा भाग बनला आहे. याने महिलांचे निव्वळ सक्षमीकरण करण्यावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर जिथे महिला केवळ लाभार्थी नसून, विकासाच्या नेत्यादेखील आहेत, असे वातावरण निर्माण केले आहे.
भारताच्या ‘जी २० एम्पॉवर’ अध्यक्षतेखाली आम्ही ही संकल्पना मनापासून स्वीकारली आहे आणि हा वर्णनात्मक बदल प्रतिबिंबित करणारा पथदर्शी उपक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे लक्ष्य तिहेरी आहे-शिक्षण, महिला उद्योजकता आणि सर्व स्तरांवर महिला नेतृत्वाला चालना देण्यासाठी भागीदारी निर्माण करणे. आम्हाला विश्वास वाटतो की, या सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल समावेशन ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत की, महिलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली डिजिटल साधने आणि संसाधनांमध्ये यांची समान उपलब्धता असेल.
शिक्षणाच्या संदर्भात आम्ही महिलांसाठी स्टेम (एसटीईएम ) शिक्षण आणि उच्च वाढीच्या नोकर्यांच्या संधींच्या वाढत्या उपलब्धतेचे समर्थन करीत आहोत. आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम आणि भविष्यासाठी सज्ज, समावेशी अभ्यासक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महामंडळांना प्रोत्साहित करीत आहोत. आम्ही महिला आणि मुलींना सतत शिकण्यास प्रोत्साहन देणारी स्पष्ट धोरणे आणि कायदेशीर चौकटींसह संपूर्ण-सरकारचा दृष्टिकोन अवलंबण्याचे आवाहन सरकारांना करीत आहोत.
आम्ही महिला उद्योजकतेच्या दृष्टीने विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) महिला उद्योजकांचे स्थान उंचावण्यासाठी एक व्यापक धोरण विकसित केले आहे. आम्हाला असा विश्वास वाटतो की, महिला उद्योजकांना अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ बनण्यास सक्षम करणे, ही वर्धित लिंगभाव समानतेसह समृद्ध अर्थव्यवस्था असणारी विजयाची परिस्थिती आहे. आम्ही खासगी क्षेत्राला केवळ आर्थिक पुरवठादार आणि खरेदीदार म्हणूनच नव्हे, तर गुरू आणि वाढीस सक्षम करणारे म्हणूनही पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.
महिलांच्या नेतृत्वाला सर्व स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निर्णय घेण्याच्या पातळीपर्यंत महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी, सर्वसमावेशक कार्यस्थळ धोरणे सादर करण्यासाठी, नियमित पुनरावलोकने आणि लिंगभाव विविधता मॅट्रिक्सचे प्रकाशन आणि महिला कर्मचार्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी क्षमता-निर्मिती कार्यक्रम विकसित करत आहोत. महिलांना खर्या अर्थाने सक्षम करण्यासाठी आपण समाजातील सर्व स्तरांवर त्यांचे नेतृत्व आणि निर्णय घेण्यामधील भूमिकांचे पालनपोषण करण्याची आवश्यकता आहे.
या उपक्रमाच्या भारताच्या अध्यक्षतेखाली सहा मूर्त परिणामांवर प्रकाश टाकताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो. सर्वप्रथम, आम्ही ‘टेक इक्विटी प्लॅटफॉर्म’ सुरू केला आहे. हा एक अनोखा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्याचे आरेखन महिलांना ज्ञानाच्या माध्यमातून पुढे राहण्यास मदत करण्यासाठी केलेले आहे. १२० भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे व्यासपीठ येत्या सहा महिन्यांत किमान दहा लाख महिलांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.दुसरे म्हणजे, आम्ही ‘केपीआय डॅशबोर्ड’ विकसित केला आहे, जो महिला सक्षमीकरण आणि प्रतिनिधित्वाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एक मोजता येण्याजोगा आणि पद्धतशीर मार्ग उपलब्ध करतो. मजबूत पद्धती वापरून या आकडेवारीचा सातत्याने मागोवा घेऊन नमुने, मूळ कारणे आणि संभाव्य हस्तक्षेप ओळखल्याने सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढू शकतो.
तिसरे म्हणजे, आम्ही सर्वोत्तम सराव ‘प्लेबुक’ तयार केले आहे. हे सर्वेक्षणावर आधारित विश्लेषणात्मक साधन असून, सर्वोत्तम पद्धतींचे संकलन करते आणि जगभरातील प्रभावी धोरणे आणि पद्धती सामायिक करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.‘प्लेबुक’च्या २०२३ आवृत्तीमध्ये ‘जी २०’ आणि अतिथी देशांमधील सर्वोत्तम १४९ पद्धतींचा समावेश आहे.चौथे, ‘जी २०’ राष्ट्रे आणि अतिथी देशांमधील महिला यशोगाथा प्रकाशित करण्यासाठी आम्ही ‘जी २० एम्पॉवर’ संकेतस्थळावर प्रेरणादायी कथांचा एक विशेष विभाग तयार केला आहे. दहा देशांमधील तब्बल ७३ प्रेरणादायी कथा ‘जी २० एम्पॉवर’ संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या आहेत.
पाचवे, आपल्या अध्यक्षतेखाली भारताने अधिवक्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी आणि प्रतिज्ञेचा स्वीकार करण्यासाठी ‘जी २० एम्पॉवर’ उपक्रमाला पाठिंबा देणे सुरू ठेवले आहे. लिंगभाव समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या प्रभावशाली संस्थांचा समावेश असलेल्या ‘जी २० एम्पॉवर’च्या अधिवक्ता जाळ्याचा विस्तार होत असून, तो ‘जी २०’ राष्ट्रांमधील ५०० हून अधिक अधिवक्त्यांपर्यंत पोहोचला आहे.या उपक्रमांव्यतिरिक्त, आम्ही गांधीनगर घोषणापत्रदेखील जारी केले आहे. ज्यात खासगी क्षेत्राकडून लिंगभाव समानतेसाठी एक महत्त्वपूर्ण वचनबद्धता आहे.
या घोषणेनुसार, कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांपैकी किमान ३० टक्के महिला असतील. याची खात्री करण्याचे वचन देतात. ज्या क्षेत्रांमध्ये आधीच ३० टक्के महिला कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी संस्थेच्या सर्व स्तरांमध्ये महिलांचा ३० टक्के सहभाग सुनिश्चित करण्याचे काम ही प्रतिज्ञा करते. ‘३० गुणीले ३०’ची ही शक्तिशाली घोषणा २०३० सालापर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट असून, अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक कार्यबल निर्माण करण्याच्या आमच्या सामूहिक वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.
(लेखिका ‘जी २० एम्पॉवर’च्या अध्यक्ष आणि ‘फिक्की’च्या माजी अध्यक्ष आहेत.)