मुंबई : अभिनेत्री अक्षया नाईकनं "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती या नाटकात मुख्य भूमिका साकरणार आहे . लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे, नुकतेच या नाटकातील अक्षयाचा लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. या नाटकाचं खूप कौतुकही झालं होतं. प्रभावळकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला साधारणतः आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. मात्र हलकेफुलके असलेले हे नाटक आजही तितकेच ताजेतवाने आहे. नाटकाचे संगीतकार सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच आहे.
अक्षया नाईक 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका असल्यानं तिनं आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. या नाटकातील तिच्या भूमिकेबद्दल तिला विचारले असता तिने अजुन थोड़ी प्रतीक्षा करावी असे सांगितले. अक्षयाबरोबर नाटकात आणखी कोण कलाकार आहेत हे मात्र अजुन गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.